या जनता दरबारात खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यासह महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड विधानसभेचे आमदार चंद्रकांत दादा पाटील पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. कोथरूड भागातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी व त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
खासदार मोहोळ यांनी केलेल्या आवाहनानुसार, नागरिकांनी आपल्या समस्यांचे निवेदन घेऊन उपस्थित राहावे. या कार्यक्रमात विविध शासकीय खात्यांचे अधिकारी उपस्थित राहणार असून नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात येईल.
या जनता दरबारात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी https://officeofmurlidharmohol.com/janasamparka-seva-abhiyan/Kothrud/04_2025 या लिंकवरून फॉर्म भरून टोकन प्राप्त करावे. टोकन जनरेट झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवावा व कार्यक्रमस्थळी येताना सादर करावा. तसेच संबंधित कागदपत्रे व समस्येचे संक्षिप्त विवरण लिहिलेले कागद सोबत आणावेत.
जनता दरबारात पुढील खात्यांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत:
- नागरी सुविधा केंद्र
- तलाठी विभाग
- संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजना विभाग
- पंतप्रधान आयुष्यमान कार्ड विभाग
- महात्मा फुले वैद्यकीय योजना विभाग
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी
- समाज विकास अंतर्गत दिव्यांगांसाठी योजना विभाग
- आधार कार्ड विभाग
- पंतप्रधान अन्य सुरक्षा विभाग
- रेशनिंग कार्ड विभाग
- पॅन कार्ड, पासपोर्ट, शॉप ऍक्ट, उद्यम आधार विभाग
- पोलीस अधिकारी विभाग
- पुणे महानगरपालिका अधिकारी विभाग
- पोस्ट ऑफिस विविध योजना
- पंतप्रधान सूर्यघर योजना विभाग
- प्रधानमंत्री आवास योजना विभाग
- प्रधानमंत्री मुद्रा व विश्वकर्मा योजना
- शहरी गरीब कार्ड
- सहकार विभाग
- लाईट हाऊस
- एमएनजीएल
- नोकरी विषयक सल्ला
हे सर्व विभाग व यतिरिक्त अन्य विभागांशी संबंधित समस्या असलेल्या नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार मोहोळ यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: