महायुती विजयाचा विश्वास; बनसोडे यांच्या प्रचाराला जनतेचा प्रतिसाद
पिंपरी (प्रतिनिधी) - राज्यातील मतदारांचा कल महायुतीकडे असून, २३ नोव्हेंबरनंतर राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने सत्तेत येईल, असा विश्वास शिवसेनेचे स्टार प्रचारक व खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ मोहननगर, महात्मा फुलेनगर आणि काळभोरनगर भागात काढण्यात आलेल्या प्रचारफेरीत ते बोलत होते. "बनसोडे यांना मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विरोधी उमेदवाराचा परिचयही मतदारांना नाही, त्यामुळे बनसोडे यांचा विजय निश्चित आहे," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रचारफेरीदरम्यान ठिकठिकाणी महिलांनी बनसोडे यांचे औक्षण करून विजयाच्या शुभेच्छा दिल्या. बनसोडे यांनी ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले. या प्रचारफेरीत आरपीआयच्या महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, आमदार उमा खापरे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बुधवारी (२० नोव्हेंबर) होणाऱ्या मतदानात घड्याळ चिन्हासमोरील प्रथम क्रमांकाचे बटण दाबून विजयी करण्याचे आवाहन आमदार बनसोडे यांनी मतदारांना केले.
"महायुतीच्या माध्यमातून राज्यात अनेक मोठी कामे झाली असून, मतदारांचा कल महायुतीच्या बाजूने आहे," असेही खासदार बारणे यांनी यावेळी सांगितले.
Reviewed by ANN news network
on
११/१७/२०२४ ११:५८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: