सुट्टी न दिल्यास कारवाईचा इशारा
पुणे : विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी उद्योग विभागांतर्गत सर्व आस्थापनांनी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी किंवा दोन तासांची सवलत द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ नुसार, मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसाय, व्यापार किंवा औद्योगिक उपक्रमातील मतदान हक्क असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुट्टी देणे बंधनकारक आहे.
अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास, जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीने किमान दोन तासांची सवलत देता येईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी सवलत मिळेल याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
सुट्टी किंवा सवलत न मिळाल्याने मतदान करता न आल्याबाबत तक्रार आल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०५:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: