महाराष्ट्र स्वराज उमेदवार भापकर यांचे किवळेमध्ये कार्यअहवाल वितरण
चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाशक्ती आघाडी व महाराष्ट्र स्वराज पक्षाचे अधिकृत उमेदवार मारुती साहेबराव भापकर यांच्या उमेदवारीला मोठा जनसमर्थन मिळत आहे. बुधवारी (दि.१३) किवळे येथील मुकाई चौक बस टर्मिनस परिसरात भापकर यांनी आपला कार्यअहवाल आणि गॅरेंटीपत्र मतदारांमध्ये वितरित केले.
विशेष म्हणजे विश्व कल्याण कामगार संघटना आणि श्रमिक एकता महासंघाचे ज्येष्ठ कामगार नेते दिलीपराव पवार यांनी भापकर यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दिला आहे. या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून दीडशेहून अधिक कामगार युनियनचा पाठिंबा भापकर यांना मिळाला आहे.
मुकाई चौक बस टर्मिनस येथील प्रवासी आणि भाजी मंडईतील नागरिकांनी भापकर यांच्या कार्यअहवाल आणि गॅरेंटीपत्राचे उत्स्फूर्त स्वागत केले. कामगार संघटनांचा पाठिंबा मिळाल्याने चिंचवड मतदारसंघात भापकर यांचे पारडे जड झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२४ ०३:५४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: