संविधानाचा अपमान करणाऱ्या काँग्रेसवर रिजिजूंचा हल्लाबोल
मुंबई -"संविधानाची अनेकदा मोडतोड करणाऱ्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कायम अवमान करणाऱ्या काँग्रेसला जनता यावेळी माफ करणार नाही," असे संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी म्हटले आहे.
भाजपा मिडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, "राहुल गांधी यांनी नागपुरात निळ्याऐवजी लाल रंगाच्या मुखपृष्ठासह कोरे कागद असलेली नकली संविधानाची प्रत नाचवली. या कृत्याने डॉ. आंबेडकरांच्या आत्म्याला वेदना झाल्या असतील."
रिजिजू यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत सांगितले की, नेहरूंनी डॉ. आंबेडकरांना पहिल्या मंत्रिमंडळातून वगळले होते. त्यांनी निवडणुकांमध्ये डॉ. आंबेडकरांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केले. 2015 पर्यंत काँग्रेसने संविधान दिन का साजरा केला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
"मुस्लिमांचा केवळ वोट बँक म्हणून वापर करून काँग्रेसने त्यांचे नुकसान केले. भाजपा मात्र सर्व घटकांना सोबत घेऊन विकास साधत आहे," असेही ते म्हणाले.
Reviewed by ANN news network
on
११/०७/२०२४ ०४:५२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: