महिलांच्या स्वप्नांना देणार भरारी फक्त तुतारी !
पिंपरी : पिंपरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सुलक्षणा शिलवंत यांच्या प्रचारार्थ पिंपरी येथील भटनागर मधे भाट समाजातील महिलांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित भगिनींनी विजयाचा निर्धार व्यक्त केला.
या वेळी विविध विषयांवर चर्च झाली , भाट समाजात शिक्षणाचा अभाव ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे समाजातील लोक नोकऱ्या आणि इतर आर्थिक संधींपासून वंचित राहतात. शिक्षणाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, भाट समाजातील लोक अनेकदा इतर समाजांकडून होणाऱ्या भेदभावाला बळी पडतात. सामाजिक ऐक्य आणि समतेच्या कल्पनेला चालना देण्यासाठी जनजागृती मोहीम, सामूहिक कार्यक्रम आणि संघटनांद्वारे जनजागृती केली गेली पाहिजे.परंतु स्थानिक आमदारांना या कशाचेच भान राहिले नाही , ते आपल्या मोठमोठ्या डील करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.
भाट समाज हा वेळोवेळी काँग्रेस च्या विचारांचा राहिला आहे,त्यामुळे काँग्रेस चा प्रभाव या समाजावर सुरवातीपासूनच राहिलेला आहे.यावेळी महाविकास आघाडीच्या माध्यमातून समविचारी पक्ष सोबत असल्या कारणाने अखंड भाट समाज डॉ.सुलक्षणा शिलवंत यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे.
आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी, आणि हक्कांसाठी आपल्याला निवडणुकीत सक्रिय सहभाग घेण्याची आवश्यकता आहे. आपण आपल्या विभागातील एका पात्र उमेदवाराला निवडून देण्यासाठी एकत्र येऊया. निवडणुकीत आपल्या मताचा प्रभाव महत्त्वाचा आहे, कारण हे मत आपल्या समाजाच्या भविष्याला आकार देईल.
समाजाच्या कल्याणासाठी, रोजगाराच्या संधी, शिक्षण, आरोग्य सेवा, आणि आपले सांस्कृतिक अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी हा एक महत्वाचा टप्पा आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन आपला आवाज बुलंद करूया आणि आपल्या समाजाच्या हितासाठी योग्य प्रतिनिधी निवडूया अशी भावना भाट समाजाने व्यक्त केली आणि डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना प्रचंड बहुमताने विजयी करू असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी काँग्रेस कमिटी पथारी सेल पिंपरी चिंचवडच्या शहरअध्यक्षा गौरी शेलार, बहुजन प्रेरणा बौद्ध समाज ट्रस्टचे अध्यक्ष फारुख, सुरेश भाऊ आदि उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१४/२०२४ ०७:३२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: