पिंपरी : शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सहकुटुंब थेरगाव येथे मतदानाचा हक्क बजाविला. थेरगाव येथील संचेती माध्यमिक विद्यालयात त्यांनी मतदान केले.
यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सरिता बारणे, मुलगा प्रताप,सुन स्नेहा बारणे होते. कायद्याने आपल्या सर्व भारतीय नागरिकांना मतदानाचा हक्क दिला आहे. प्रत्येकाने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजाविला पाहिजे. लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभाग घ्यावा. मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मजबूत करावी, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले.
खासदार श्रीरंग बारणे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
Reviewed by ANN news network
on
११/२०/२०२४ ०३:२६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/२०/२०२४ ०३:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: