'रामविलास पासवान सेवा पुरस्कार २०२४' चे वितरण
पुणे : जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाचा वर्धापन दिन रविवार, १० नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पद्मभूषण केंद्रीय मंत्री रामविलास पासवान सेवा पुरस्कार २०२४ चे वितरण आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अंकल सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात पथारी व्यावसायिक आणि विक्रेत्यांची जाहीर सभा देखील घेण्यात आली.
यावेळी अॅड. शैलजा ज्ञानेश्वर मोळक, माजी सहायक पोलिस आयुक्त मिलिंद गायकवाड, रुग्ण हक्क परिषदचे अध्यक्ष उमेश चव्हाण, 'प्रबोधन माध्यम' चे संस्थापक डॉ. दीपक बीडकर, आदर्श शिक्षक सुरेश भंडारे यांना प्रतिष्ठित पुरस्काराने गौरविण्यात आले.
साधू वासवानी चौकातील पथारी संघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
जनशक्ती पथारी विक्रेता कल्याणकारी संघाचे अध्यक्ष संजय आल्हाट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले की, "संघटनेचे साडेतीन हजार सभासद आहेत आणि आम्ही शासकीय योजना व सुविधा मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत. पथारी व्यावसायिकांसाठी पालिकेने शिबिरे आयोजित करावीत, यासाठी आम्ही पाठपुरावा करू. हक्कांची प्राप्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा निर्धार आहे."
पथारी संघाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष कल्पना जावळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार अभिजीत पाटील यांनी मानले, तर सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले.
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ १२:२८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: