पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांच्या भाजी मंडई भेटीदरम्यान 'रामकृष्ण हरी वाजवा तुतारी'च्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला.
सकाळच्या वेळी भाजी मंडईत पोहोचताच विक्रेते आणि ग्राहकांनी एकजुटीने दिलेल्या प्रतिसादाने परिसर जागृत झाला. "सुलक्षणा ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" अशा घोषणांनी वातावरण दणाणून गेले.
"सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा प्रतिसाद पाहून डोळ्यांचे पारणे फिटले," अशा भावनिक शब्दांत डॉ. धर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी मंडईतील विक्रेत्यांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आश्वासन दिले.
विक्रेत्यांनी आणि नागरिकांनी एका उच्चशिक्षित महिला उमेदवाराकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या. महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन परिवर्तन घडवण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
भाजी विक्रेते, फळ विक्रेते आणि स्थानिक नागरिकांनी डॉ. धर यांच्या नेतृत्वाखाली विकासकार्य होण्याची आशा व्यक्त केली. यावेळी मंडईतील ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आशीर्वाद दिले.
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ १२:२३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: