पिंपरी - "विद्यार्थ्यांनी वित्तीय साक्षरतेचे महत्व विद्यार्थी दशेतच जाणून घेणे आवश्यक आहे," असे प्रतिपादन फिंटोपीडिया संस्थेचे मुख्य धोरण अधिकारी अंकित मेहता यांनी केले.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) येथे आयोजित वित्तीय साक्षरता कार्यशाळेत ते मार्गदर्शन करत होते.
मेहता यांनी आपल्या व्याख्यानात वित्तीय साक्षरता, वैयक्तिक वित्तीय व्यवस्थापन, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन यासह भविष्यकालीन उद्दिष्टपूर्तीसाठी आर्थिक नियोजनाचे महत्व विशद केले. कर्ज व्यवस्थापन आणि आर्थिक स्वयंशिस्तीबाबतही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेदरम्यान झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी म्युच्युअल फंड, विमा, शेअर बाजार आणि शैक्षणिक कर्ज याविषयी विचारलेल्या प्रश्नांना मेहता यांनी विविध उदाहरणांसह समर्पक उत्तरे दिली.
कार्यक्रमाला आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांच्यासह एमबीए, एमसीए, बीबीए व बीसीए विद्याशाखांचे विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. गंगाधर डुकरे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. मधुरा देशपांडे यांनी केले, तर सूत्रसंचालन खुशी चोरडिया यांनी व आभार प्रदर्शन संस्कृती कांबळे यांनी केले.
Reviewed by ANN news network
on
११/१४/२०२४ ०२:५२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: