आकुर्डी - "राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी" या जयघोषात पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांच्या प्रचार पदयात्रेला आज आकुर्डी परिसरात प्रचंड जनसमुदायाचा पाठिंबा मिळाला.
श्री विठ्ठल मंदिरात श्रीफळ वाहून सुरू झालेल्या या पदयात्रेत दत्तवाडी, विठ्ठलवाडी, क्रांतीनगर, श्रीकृष्ण नगर, एकतानगर, पंचारानगर, गुरुदेवनगर आणि आकुर्डी गावठाण परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. विशेषतः महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी नगरसेवक गिरीष कुटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे इखलास सय्यद, पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष राजेंद्र कदम यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. पदयात्रेदरम्यान अनेक ठिकाणी स्थानिक महिलांनी उमेदवारांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या.
सुलक्षणा शिलवंत यांच्या प्रचारासाठी सोशल मीडिया, गाठीभेटी, कोपरा सभा आणि एलईडी स्क्रीनद्वारे व्हिजन प्रदर्शन असे विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. या सर्वांगीण प्रचारामुळे या भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची प्रभावी उपस्थिती जाणवत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रीय काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि इतर घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे केलेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे विरोधी पक्षांच्या गोटात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१४/२०२४ ०६:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: