शंकर जगताप यांच्या प्रचारफेरीला उदंड प्रतिसाद
चिंचवड (प्रतिनिधी) : चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचार मोहिमेला नवी सांगवी परिसरात भव्य प्रतिसाद मिळाला. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पदयात्रा यशस्वी ठरली.
कृष्णा नगर, सह्याद्री कॉलनी, विद्यानगर, ज्ञानेश पार्क, नंदनवन कॉलनी, गुरुदत्त कॉलनी, साईनाथ कॉलनी, विनायक नगर, सुयोग कॉलनी आणि त्रिमूर्ती कॉलनी या भागात झालेल्या पदयात्रेदरम्यान स्थानिक महिलांनी जगताप यांचे औक्षण करून स्वागत केले. अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.
"स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी तयार केलेल्या विकासाच्या ब्ल्यू प्रिंटनुसार मतदारसंघाचा विकास करण्यावर भर देणार आहे. विधानसभेत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणार असून, प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे," असे आश्वासन जगताप यांनी दिले.
पदयात्रेत माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, अंबरनाथ कांबळे, बळीराम जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. मंडल उपाध्यक्ष कविता निखाडे, शितल आगरखेड यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, प्रभागातील सर्व धार्मिक स्थळांच्या प्रमुखांची भेट घेत जगताप यांनी आशीर्वाद घेतला. सोसायट्यांचे चेअरमन, सदस्य आणि सार्वजनिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला. सर्व स्तरांतून मिळालेल्या प्रतिसादामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा कमळ फुलणार असा विश्वास स्थानिक जनतेतून व्यक्त होत आहे.
"आजच्या पदयात्रेत सहभागी झालेला प्रत्येकजण विजयाचा संकल्प घेऊन आला आहे. त्यामुळे महायुतीचा महाविजय निश्चित होणार असा मला विश्वास आहे," असे जगताप यांनी यावेळी म्हटले.
Reviewed by ANN news network
on
११/०९/२०२४ ०५:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: