अजित गव्हाणे यांना संधी द्या: जयंत पाटलांचे भोसरीकरांना आवाहन
भोसरी (प्रतिनिधी): "मतदानादरम्यान कोणीही दमदाटी किंवा धमकी देत असेल तर घाबरून जाऊ नका. २३ नोव्हेंबरची मतमोजणी झाल्यानंतर सर्व गुंड भोसरीतून पळून जातील अशी व्यवस्था आम्ही करू," असे ठाम आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.
चिखली घरकुल येथे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
"शरद पवार यांच्या दूरदृष्टीमुळे पिंपरी-चिंचवड शहराचा विकास झाला. मात्र गेल्या दहा वर्षांत शहराच्या वाटण्या करून याचे नुकसान केले गेले," असे पाटील म्हणाले.
त्यांनी महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नातील घसरणीचा मुद्दा उपस्थित केला. "फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात अकराव्या क्रमांकावर घसरला. एअरबस, वेदांता-फॉक्सकॉन सारखे मोठे प्रकल्प गुजरातला गेले," अशी टीका त्यांनी केली.
सभेला शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर आझम पानसरे, माजी आमदार विलास लांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२४ ०३:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: