52 टक्के समाजाची प्रतिनिधी संघटना महायुतीच्या बाजूने
चिंचवड (प्रतिनिधी): चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या उमेदवारीला महत्त्वाचे बळ मिळाले आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी ओबीसी संघटना असलेल्या अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाने जगताप यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
संघाचे अध्यक्ष हनुमंत सुतार यांनी जगताप यांना पाठिंब्याचे पत्र देत चिंचवड मतदारसंघातील सर्व ओबीसी मतदारांना 'कमळ' चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. राज्यातील 52 टक्के समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघटनेत कर्मचारी, विद्यार्थी, महिला, शेतकरी आघाडी आणि गोर बंजारा समाज संघटनांचा समावेश आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुती सरकार नेहमीच ओबीसी बांधवांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. मतदारसंघातील ओबीसी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करेन," असे आश्वासन जगताप यांनी दिले.
यावेळी संघाचे कार्याध्यक्ष नानासाहेब टेंगळे, प्रसिद्धीप्रमुख कादंबरी वेदपाठक, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा शोभा झिंगाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२४ ०३:३०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: