पिंपरीत बनसोडे यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी (प्रतिनिधी): "व्यापारी किंवा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल असे कोणतेही काम मी केले नाही, उलट त्यांच्या मदतीसाठी नेहमीच तत्पर राहिलो," असे प्रतिपादन पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आण्णा बनसोडे यांनी केले.
लिंक रोडपासून सुरू झालेल्या प्रचार फेरीत पत्रा शेड, भाटनगर, आंबेडकर वसाहत, रिवर रोड आणि पिंपरी गाव परिसरात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी महिलांनी ठिकठिकाणी बनसोडे यांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या, तर युवकांनी पुष्पवृष्टी केली.
"ज्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन बाकी आहे, त्यांचे पुनर्वसन येत्या कार्यकाळात निश्चितपणे करून देऊ," असे आश्वासन बनसोडे यांनी दिले. त्यांनी युवकांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.
यावेळी माजी नगरसेवक प्रभाकर वाघेरे, नाना काटे, आरपीआय शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२४ ०५:५५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: