"धर्माचे कार्ड खेळून नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न" - युवा सेनेचा आरोप
भोसरी (प्रतिनिधी): भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला दिलेल्या धोक्याचा बदला घेण्यासाठी युवा सेना सज्ज झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना विजयी करण्यासाठी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद पणाला लावण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
युवा सेनेच्या (उबाठा) निर्धार मेळाव्यात बोलताना कार्यकर्त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. "गेल्या दहा वर्षांत काहीच काम न करता आता धर्माचे कार्ड खेळून नाकर्तेपणा लपवण्याचा प्रयत्न होत आहे," असा आरोप करण्यात आला.
प्रत्येक कार्यकर्त्याने किमान 25 मतदार अजित गव्हाणे यांच्यासाठी जोडण्याचे नियोजन करण्यात आले. "कोणत्याही धमक्यांना घाबरण्याची गरज नाही, जशास तसे उत्तर देण्यास युवा सेना सज्ज आहे," असा इशाराही देण्यात आला.
मेळाव्यास माजी नगरसेवक विनायक रणसुभे, अभिराज गव्हाणे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सचिन सानप, शहर प्रमुख अजिक्य उबाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२४ ०५:२८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: