अण्णा बनसोडे यांच्या विजयासाठी मोट बांधण्याचा प्रयत्न
पिंपरी चिंचवड – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील विविध मान्यवरांच्या भेटी घेतल्या. यामध्ये विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान पार्थ पवार म्हणाले की, विधान परिषद मिळाल्यामुळे पिंपरी विधानसभेत आमच्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.
आमदार अमित गोरखे यांची पिंपरी विधानसभेतील 398 बूथवर असणारी पकड आणि सर्व प्रभागांत दांडगा जनसंपर्क पाहता, उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे पार्थ पवार यांनी यावेळी सांगितले.
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि येणाऱ्या काळात काय पावले उचलावी यावर सविस्तर चर्चा झाल्याचे आमदार गोरखे यांनी सांगितले. या भेटीदरम्यान भाजपाचे राजेश पिल्ले, अजित भालेराव, देवदत्त लांडे, पंकज दलाल, शाकीर भाई शेख, बादशाह इटकर, धरंम वाघमारे, धर्मेंद्र क्षीरसागर, गणेश लंगोटे, जयेश चौधरी, राजू होसमणी आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते.
आमदार गोरखे यांच्या व्यतिरिक्त पार्थ पवार यांनी भाजपचे अनेक नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची देखील भेट घेतली असल्याचे समजते.
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०६:३४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: