बोपखेल - पिंपरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत धर यांच्या बोपखेल दौऱ्याला आज अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तुतारीच्या नादात सर्व वयोगटांतील नागरिकांनी त्यांच्या प्रचार फेरीत सहभाग नोंदवला.
ज्येष्ठ नागरिकांनी घेतलेल्या संवाद बैठकीत डॉ. शिलवंत यांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करत निवडणुकीपूर्वीच विजयी जल्लोष साजरा केला. महिलांनी पारंपरिक पद्धतीने ओवाळणी करून स्वागत केले आणि परिवर्तन घडवण्यासाठी पूर्ण महिलाशक्ती सोबत असल्याचे आश्वासन दिले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी संपूर्ण रॅलीत सहभाग घेत मतदारांना तुतारी चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. तरुणांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडत विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.
हरिओम ज्येष्ठ नागरिक संघ, जय जगदीश संघ यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी उपस्थिती दर्शवली. प्रतीक्षा घुले, कोवे सर यांनी महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
घराघरांतून नागरिक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्याने प्रचार फेरीचे रूपांतर जनसागरात झाले होते. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थितीत ही प्रचार फेरी यशस्वी झाली.
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०६:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: