वाशी:देशभरातील २० राज्यातील कुशल कारागिरांनी बनविलेल्या हस्तनिर्मित सिल्क कपडे, साड्या, शाली यांचे प्रदर्शन असणारे 'सिल्क विव्ह्ज' हे विशेष प्रदर्शन दि. २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४ दरम्यान सिडको एक्झिबिशन सेंटर (वाशी, नवी मुंबई) येथे आयोजित केले जाणार आहे. हे प्रदर्शन दररोज सकाळी ११ वाजता ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले असेल.
लग्नसराईचे खास आकर्षण
या प्रदर्शनात लग्नसराईच्या निमित्ताने विविध प्रकारच्या पारंपारिक आणि उत्सवी परिधानांचे प्रदर्शन होणार आहे. यामध्ये सिल्क, लिनन, कॉटन यांसारख्या विविध प्रकारच्या कपड्यांचा समावेश असेल. साड्या, ड्रेस, सूट, कुर्ते, शाली आणि विविध हस्तनिर्मित कपडे येथे प्रदर्शित केले जातील, ज्यामुळे पारंपारिक आणि आधुनिकता यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळेल.
हस्तकलेचे खास स्टॉल्स
या प्रदर्शनात भारताच्या विविध राज्यांमधून आणलेल्या रेशीम आणि कॉटन वस्त्रांच्या ७० पेक्षा अधिक स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. यामध्ये विविध प्रकारची हस्तकला उत्पादने देखील उपलब्ध असतील, ज्यामुळे विविध राज्यांच्या सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडेल.
प्रवेश विनामूल्य
प्रदर्शनाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांना विनामूल्य प्रवेश देण्यात आलेला आहे. त्यामुळे हस्तनिर्मित कपड्यांची आणि कलात्मक वस्त्रांची आवड असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: