विकासाच्या मुद्द्यांवर भर; विरोधकांचा उल्लेख टाळला
भोसरी - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भोसरी सभेत विरोधकांचा 'अनुल्लेख' करत राजकीय कौशल्याचे प्रदर्शन केले असून, हा 'अनुल्लेख' विरोधकांना पचवणे कठीण जात असल्याचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी सांगितले.
बुधवारी गाव जत्रा मैदानावर झालेल्या सभेत शरद पवार यांनी विरोधकांवर टीका न करता महिलांची सुरक्षा, रोजगार, कौशल्य विकास, कारखानदारी अशा विकासाच्या मुद्द्यांवर भर दिला. "विरोधकांवर टीका केली असती तर एका दिवसात बातमीची टाईमलाईन संपली असती, मात्र 'अनुल्लेखा'मुळे दोन दिवसांनंतरही चर्चा सुरू आहे," असे भालेकर म्हणाले.
उत्तर पुणे जिल्ह्यातील मतदारसंघांत मात्र पवारांनी विरोधकांना 'गद्दार' म्हणत टीका केली. भोसरीत मात्र त्यांनी विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देत राजकीय परिपक्वता दाखवली.
"भोसरी मतदारसंघातील वातावरण बदलले असून, गेल्या दहा वर्षांतील दडपशाही झुगारून देण्यासाठी नागरिक परिवर्तनासाठी सज्ज झाले आहेत," असेही भालेकर यांनी नमूद केले.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०७:५६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: