डब्बू आसवानी यांच्यासह व्यापारी वर्गाचा बनसोडेंना पाठिंबा
पिंपरी : पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्याविषयी असलेली नाराजी दूर करण्यात महायुतीचे समन्वयक योगेश बहल यांना यश आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत माजी उपमहापौर डब्बू आसवानी व इतर नेत्यांसोबत बैठक घेऊन हा तोडगा काढला.
पिंपरी कॅम्पातील व्यापारी आणि माजी महापौर डब्बू आसवानी यांनी बनसोडे यांच्या कार्यपद्धतीबद्दल व्यक्त केलेली नाराजी अजित पवार यांनी दूर केली. त्यांनी बनसोडे यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होईल असे आश्वासन दिले.
उल्लेखनीय म्हणजे यापूर्वीच १९ इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेऊन बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यात आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, शिवसेनेचे जितेंद्र ननावरे आणि कामगार नेते बाबा कांबळे यांचा समावेश आहे.
"आता अजितदादा पवार आणि महायुतीतील सर्व घटक पक्षांनी अण्णा बनसोडे यांना विक्रमी मतांनी निवडून देण्याचा निर्धार केला आहे," असे योगेश बहल यांनी सांगितले.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०४:४९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: