गुरुनानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त प्रसन्न ऑटिझम सेंटरला भेटवस्तू
पुणे (प्रतिनिधी) - स्वमग्न मुलांच्या थेरपी सेंटरसाठी राज्य शासनाकडे विशेष पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आश्वासन संदीप खर्डेकर यांनी दिले. गुरुनानक जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशन व नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रसन्न ऑटिझम सेंटरला भेटवस्तू देण्यात आल्या, त्यावेळी ते बोलत होते.
"स्वमग्न मुलांच्या समस्या अत्यंत वेगळ्या स्वरूपाच्या असून, त्यांचा दिनक्रम आणि त्यांना होणारा त्रास पाहिल्यावर त्यांच्या वेदनांची कल्पना येते. अशा मुलांसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल," असे खर्डेकर यांनी सांगितले.
प्रसन्न ऑटिझम सेंटरच्या कार्यकारी संचालिका साधना गोडबोले यांनी केंद्र सरकारने दिव्यांग जनांच्या यादीत स्वमग्न मुलांचा समावेश केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्याचबरोबर राज्य सरकारने अशा मुलांसाठी थेरपी सेंटर उभारावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वमग्न मुलांच्या संगोपन व उपचारासाठी केंद्र उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
या कार्यक्रमास नवलराय ए हिंगोरानी ट्रस्टचे विश्वस्त मनोज हिंगोरानी, प्रसन्न ऑटिझम सेंटरचे संचालक सुभाष केसकर यांच्यासह स्वमग्न विद्यार्थी उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०४:३८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: