राजकीय पक्षांनी असंवेदनशीलता दाखविल्याने डी एस के ठेवीदार नाराज
पुणे : डी.एस. कुलकर्णी यांच्या कंपन्यात तब्ब्ल 32 हजार ठेवीदारांची 1200 कोटी रुपयांची संघटित पणे लूट करण्यात आली, तरी असंवेदशीलता दाखविणाऱ्या राजकीय पक्षांच्या बाबतीत डिएसके ठेवीदार नाराज असून विधानसभा निवडणुकीबाबत आक्रमकपणे निर्णय घेण्याच्या मानसिकतेत आहे.डीएसके ठेवीदार संघटना,हिंदू महासंघा च्या मदतीने अनेक महिने आंदोलनात असून हिंदू महासंघ चे अध्यक्ष आनंद दवे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पुढील वाटचालीची माहिती देण्यात आली आहे.
सर्व सरकारी यंत्रणा याबाबत पूर्ण असंवेदनशील असून कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेतृत्वाने सुद्धा या ठेवीदारां प्रति अनुकूलता दाखवली नसल्याने हिंदू महासंघ च्या सहकार्यने हे सर्व ठेवीदार पहिल्यांदाच राजकीय निर्णय घेण्याच्या विचारात आहेत.
कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता उलट ती डावलून सर्व ठेवीदारांची फसवणूक करण्यात आली आहे, याकडे ठेवीदारांनी लक्ष वेधले आहे.
10 नोव्हेंबर रोजी चित्तरंजन वाटीका बागेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीत सर्व ठेवीदार आणि हिंदू महासंघ कडून आनंद दवे सहित, सूर्यकांत कुंभार, मनोज तारे, नितीन शुक्ल आणि आदिती जोशी उपस्थित होते. ठेवीदार संघटनेचे प्रतिनिधी दीपक फडणवीस, शरद नातू, सुधीर गोसावी, नितीन मोरे आदी उपस्थित होते.
पुढील 2/3 दिवसात मेळावा घेऊन अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे आनंद दवे यांनी सांगितले आहे
विधानसभा निवडणुकीत डी एस के ठेवीदार ठोस निर्णय घेणार : ठेवीदार संघटना, हिंदू महासंघ आक्रमक
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ ०३:२८:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ ०३:२८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: