सिद्धिविनायक मंदिराच्या धर्तीवर सर्व मंदिरांनी टिळा लावण्याची परंपरा सुरू करावी : मंदिर महासंघाचे आवाहन
मुंबई (प्रतिनिधी): श्री सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने भाविकांच्या कपाळी टिळा लावण्याचा घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत महाराष्ट्र मंदिर महासंघाने राज्यातील इतर मंदिरांनीही अशीच परंपरा सुरू करावी, असे आवाहन केले आहे.
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने नुकताच दर्शन घेतलेल्या प्रत्येक भाविकाला श्रीगणेशाच्या आशीर्वादाचे प्रतीक म्हणून कपाळी टिळा लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भक्तांना देवतेच्या शक्ती आणि चैतन्याचा लाभ मिळेल, असा विश्वास महासंघाने व्यक्त केला आहे.
हिंदू धर्मात कपाळावरील टिळ्याला विशेष आध्यात्मिक महत्त्व असल्याचे सांगत महासंघाने म्हटले की, यामुळे भक्तिभाव वृद्धिंगत होण्यास मदत होते. सिद्धिविनायक मंदिराच्या या निर्णयाचे अनुकरण राज्यातील इतर मंदिरांनी करावे, अशी अपेक्षाही महासंघाने व्यक्त केली आहे.
मंदिर विश्वस्त आणि प्रशासनाने या विषयी सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही आवाहन महासंघाने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: