काळेवाडीत सर्वांगीण विकासाचे वचन, महायुतीचे उमेदवार शंकर जगताप
चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी आमदार अश्विनी जगताप यांनी आज काळेवाडी परिसरात मतदारांशी संवाद साधला. यावेळी कोपरा सभा, महिला बचत गटांच्या भेटीगाठी, आणि ‘डोअर टू डोअर’ दौऱ्याद्वारे त्यांनी मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. मतदारांनी या दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला, तसेच काळेवाडीच्या विकासासाठी शंकर जगताप यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रचार दौऱ्यात अश्विनी जगताप यांनी विजयनगर मेनरोड, अजिंक्य कॉलनी, सहकार कॉलनी, साईनाथ कॉलनी, नढेनगर, प्रेम लोक कॉलनी, शांती कॉलनी, सहारा कॉलनी यांसारख्या भागांमध्ये भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते राजेश पिल्ले, माजी नगरसेविका नीता पाडाळे, ज्योती भारती, प्रमोद ताम्हणकर, सुनील पालकर, संगीता कोकणे यांसह महायुतीतील विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अश्विनी जगताप यांनी या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे यांच्यासह अनेक मान्यवरांची भेट घेतली. यावेळी त्यांनी काळेवाडीतील विकासकामांच्या बाबत माहिती दिली आणि शंकर जगताप यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा पाठिंबा मिळावा, असे आवाहन केले.
अश्विनी जगताप यांनी लक्ष्मणभाऊंच्या कार्यकाळात काळेवाडीत झालेल्या विकासकामांवर प्रकाश टाकत, पुढील काळात शंकर जगताप यांच्या माध्यमातून विकासाची गती वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला. शंकर जगताप यांना विजयी करून मतदारसंघाच्या विकासासाठी महायुतीचे बळ द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
स्व. आमदार लक्ष्मणभाऊ आणि माझ्यावर काळेवाडीतील जनतेने भरभरून प्रेम केले आहे. आता हाच विश्वास आणि प्रेम शंकर जगताप यांच्यावर दाखवा. काळेवाडी आणि चिंचवड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ते नक्कीच समर्थपणे निभावतील.
- अश्विनी जगताप, आमदार
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२४ ०८:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: