भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाऊंडेशनचा २२९वा सांस्कृतिक कार्यक्रम
पुणे - भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित 'आदी अष्टकम' या ओडिसी नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली.
ज्येष्ठ कला अभ्यासक डॉ. उषा आर.के. (मास्को) यांनी प्रस्तुत केलेल्या या कार्यक्रमात आदी शंकराचार्यांच्या रचनांवर आधारित नृत्य सादरीकरण करण्यात आले. सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवन सभागृहात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या विनामूल्य कार्यक्रमाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
देशभरातील नामवंत ओडिसी नृत्य कलाकार सहाना मारिया, नम्रता मेहता, सौरव मोहंती, रसिका गुमास्ते आणि मधुलिता मोहपात्रा यांनी आदी अष्टकम मधील अद्वैत तत्वाचे भाव नेमकेपणाने सादर केले.
भारतीय विद्या भवनचे सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचे स्वागत व सत्कार केला. हा कार्यक्रम भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा २२९वा कार्यक्रम होता.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०८:०८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: