"नागरिकांच्या न्यायासाठी सदैव पाठीशी" - भाऊसाहेब भोईर
चिंचवड (प्रतिनिधी): चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी मंगळवारी वाकड येथे मतदारांशी थेट संवाद साधत प्रचार दौरा केला. या वेळी वाकडकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
"मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, उमेदवाराची पार्श्वभूमी पाहून मतदान करावे. नागरिकांच्या न्यायासाठी व हक्कासाठी मी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन," असे भोईर यांनी सांगितले.
भेटीदरम्यान नागरिकांनी सोसायट्यांचे विविध प्रश्न मांडले. "या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी भाऊसाहेब प्रयत्न करतील. चिंचवडला बदल हवा आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत," अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाला आत्माराम कलाटे, भरत आल्हाट, विष्णू कस्पटे, डॉ. कपिल साओजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ ०८:३३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: