चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले असून, विविध सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक संघटनांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
मतदारसंघातील सोसायटीधारक, आयटी क्षेत्रातील कर्मचारी, वकील, डॉक्टर्स, व्यापारी, कामगार आणि इंजिनिअर्स यांच्यासह अनेक महिला बचत गट व सार्वजनिक तरुण मंडळांनी जगताप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, महाराष्ट्र मजूर पक्ष, विविध समाज संघटना, धार्मिक संस्था आणि वाद्यपथकांसह ५० हून अधिक संघटनांनी पाठिंब्याचे पत्र देऊन जगताप यांच्या उमेदवारीला बळकटी दिली आहे.
विशेष म्हणजे टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन, डॉक्टर्स असोसिएशन, ऍडव्होकेट असोसिएशन आणि अभियंता संघटनांनीही त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या सर्व संघटनांनी जगताप यांना एक लाखांहून अधिक मतांनी विजयी करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात जगताप यांच्या प्रचाराला मिळणारा हा व्यापक जनसमर्थन त्यांच्या विजयाची शक्यता वर्तवत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१७/२०२४ ०४:५४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: