अजित गव्हाणे यांच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 


तरुणांचा स्वयंस्फूर्त सहभाग, कामगारवर्गाचा पाठिंबा

व्यापारी वर्गाकडून एकजुटीने मतदानाचा निर्धार

भोसरी (वृत्तसंस्था) - भोसरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळत असून, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.

चक्रपाणी वसाहत, महादेवनगर आणि लांडगे वस्ती परिसरात झालेल्या पदयात्रेदरम्यान नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मूलभूत प्रश्नांची सोडवणूक, महापालिकेकडे पाठपुरावा, शांतता आणि महिलांची सुरक्षा या मुद्द्यांवर गव्हाणे यांनी भर दिला.

माजी नगरसेविका सारिका लांडगे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष लांडगे यांनीही पदयात्रेत सहभाग घेतला. तरुणांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला असून, अनेकांनी गव्हाणे यांच्यासोबत सेल्फी काढले.

टाटा मोटर्स कंपनीबाहेर कामगारांशी संवाद साधताना गव्हाणे यांनी त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. स्मॉल क्लस्टर उभारणी आणि मोशी येथील एक्झिबिशन कन्व्हेन्शन सेंटरच्या कार्यान्वयनासाठी प्रयत्न करण्याचे त्यांनी सांगितले.

येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले असून, 'राम कृष्ण हरी वाजवा तुतारी' या घोषणेने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अजित गव्हाणे यांच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद अजित गव्हाणे यांच्या प्रचाराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद Reviewed by ANN news network on ११/१५/२०२४ ०७:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".