तोतया डबेवाला संघटनांपासून सावधानतेचा इशारा
मुंबई (प्रतिनिधी): मुंबईतील डबेवाल्यांच्या अधिकृत संघटनेने भारतीय जनता पार्टी आणि महायुती उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला असून, इतर पक्षांना पाठिंबा दिल्याचे सांगणाऱ्या तोतया संघटनांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 1890 पासून कार्यरत असलेल्या त्यांच्या संघटनेने 134 वर्षांत प्रथमच एका राजकीय पक्षाला पाठिंबा दिला आहे.
"महायुती सरकारने डबेवाल्यांसाठी घरे देण्यासह केलेल्या कामांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. स्वत:ला डबेवाल्यांचे नेते म्हणवणारे काही जण इतर पक्षांना पाठिंबा दिल्याचे गैरसमज पसरवत आहेत," असे मुके म्हणाले.
या तोतया पदाधिकाऱ्यांविरुद्ध डबेवाल्यांची फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी दाखल असून, अफरातफरीच्या प्रकरणांचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Reviewed by ANN news network
on
११/१२/२०२४ ०९:१९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: