चिंचवडचा आमदार स्थानिक हवा - अनंत कोऱ्हाळे
चिंचवड (प्रतिनिधी) - चिंचवड विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलत असून, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे उमेदवार आणि अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख यांनी अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना सिद्दिक शेख यांनी सर्व संविधानप्रेमी आणि लोकशाहीप्रेमी जनतेला भोईर यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. बहुजन, अल्पसंख्य व दलित समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या अपना वतन संघटनेने भोईर यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेण्याचे जाहीर केले.
भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या तीन दशकांच्या राजकीय अनुभवाचा उल्लेख करत, विकासाची विचारधारा आपली प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले. "नोटापेक्षा भाऊसाहेब भोईर हा मतदारांसाठी उत्तम पर्याय आहे," असे ते म्हणाले.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक अनंत कोऱ्हाळे यांनीही भोईर यांना व्यक्तिगत पाठिंबा जाहीर केला. "चिंचवडचा आमदार स्थानिक असावा," अशी भावना व्यक्त करत त्यांनी भोईर यांच्या उमेदवारीचे समर्थन केले.
रिपब्लिकन पक्षाचे दोन गट तसेच तेली, माळी, धनगर, मातंग समाजाचा पाठिंबा आधीच असलेल्या भोईर यांना आता मुस्लिम समाजाचाही पाठिंबा मिळाल्याने त्यांच्या विजयाची शक्यता वाढली आहे.
Reviewed by ANN news network
on
११/१५/२०२४ ०७:२३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: