भोसरी (प्रतिनिधी) - महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या नेहरूनगर, मासुळकर कॉलनी आणि अजमेरा परिसरातील प्रचार दौऱ्याला उच्चांकी प्रतिसाद मिळाला. माजी महापौर हनुमंत भोसले यांनी नेहरूनगरमधून सर्वाधिक 'लीड' मिळवून देण्याचा विश्वास व्यक्त केला.
माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले यांच्या कार्यालयापासून सुरू झालेल्या दौऱ्यात गव्हाणे यांनी विविध मंदिरांचे दर्शन घेतले आणि नागरिकांशी संवाद साधला.
"अजित गव्हाणे हे शरद पवार यांचे उमेदवार आहेत. पवारांच्या दूरदृष्टीने शहराची प्रगती झाली आहे. त्यांच्या संघर्षाला न्याय देण्याची जबाबदारी आपली आहे," असे भोसले म्हणाले.
गव्हाणे यांनी पाणी व्यवस्था, पुनर्वसन प्रकल्प, महापालिका शाळांचे आधुनिकीकरण आणि तरुणांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबवण्याचे आश्वासन दिले.
माजी महापौर वैशाली घोडेकर, माजी नगरसेवक समीर मासुळकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Reviewed by ANN news network
on
११/१०/२०२४ ०७:०८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: