फुलांचा वर्षाव आणि आशीर्वादांच्या गर्दीत दापोडी दौरा
दापोडी (वृत्तसेवा): पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्या दापोडी भागातील प्रचार फेरीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हजारो नागरिकांनी फुलांचा वर्षाव करून आणि ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद देऊन त्यांचे स्वागत केले.
फिरंगाई देवी चौकापासून सुरू झालेल्या प्रचार फेरीदरम्यान "राम कृष्ण हरी वाजवा तुतारी" या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कंटेनरभर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
डॉ. शिलवंत यांनी दापोडीतील विविध भागांना भेटी दिल्या. नेहरू चौक, सिद्धार्थ नगर, जय भीम नगर, भाजी मंडई, शिवशक्ती तरुण मंडळ, गुलाब नगर, पत्राचाळ, महात्मा फुले नगर, काचीवाडा, दापोडी गावठाण यासह अनेक भागांमध्ये त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
प्रत्येक भागात रस्त्यावर शेकडो नागरिक स्वागतासाठी उपस्थित होते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आशीर्वाद दिले. या अभूतपूर्व स्वागतामुळे संपूर्ण दापोडी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२४ ०८:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: