ठाणे पोलीस आयुक्तालयात सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन सेलला पोलीस ठाण्याचा दर्जा
ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे शहरातील सायबर गुन्ह्यांचा प्रभावी तपास करण्यासाठी पोलीस मुख्यालय कॅम्पस, कोर्ट नाका येथे नव्याने उभारलेल्या स्वतंत्र इमारतीत आज सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले.
ठाणे पोलीस आयुक्त श्री. आशुतोष डुंबरे यांच्या उपस्थितीत या अत्याधुनिक यंत्रणेने सुसज्ज असलेल्या पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस सह आयुक्त, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), अपर पोलीस आयुक्त (प्रशासन), अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) आणि आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने १५ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार ठाणे पोलीस आयुक्तालयातील सायबर क्राइम इन्व्हेस्टिगेशन सेलला पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात आला आहे.
नागरिकांना सायबर गुन्ह्यांसंदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी ठाणे पश्चिम येथील शासकीय विश्रामगृहाजवळ, कोर्ट नाका येथे स्वतंत्र इमारत उभारण्यात आली आहे. नागरिक ०२२-२५४२९८०४ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा cp.thane.ccic@mahapolice.gov.in या ईमेलवर तक्रार नोंदवू शकतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: