उरणमधील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
उरण (प्रतिनिधी): उरण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत करंजा कोळी कोंढरीपाडा येथील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
करंजा मच्छीमार सोसायटीचे विद्यमान सदस्य गौरेश कोळी यांच्यासह रोहित कोळी, संतोष कोळी, केतन कोळी, ओमकार कोळी, सिद्धेश्वर कोळी, विक्रांत कोळी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची वस्त्रे धारण केली. उपतालुका संघटक व चाणजे माजी सरपंच अमित भगत यांच्या प्रयत्नांमुळे हा पक्षप्रवेश शक्य झाला.
माजी आमदार मनोहर भोईर आणि उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी नवीन कार्यकर्त्यांचे भगवी शाल अर्पण करून स्वागत केले. या कार्यक्रमास विभागप्रमुख राजू पाटील, शाखाप्रमुख अमृत कोळी, उपशाखाप्रमुख विघ्नेश नाखवा, गजानन लव्हले, नंदू चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पक्षप्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढत असून, मनोहर भोईर यांचा प्रभाव कायम असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणे बदलत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: