आठ महिन्यांनंतरही नुकसान भरपाई नाही; पनवेल संघर्ष समितीचे आंदोलन

 


कै. निलेश म्हात्रे याच्या अपघाताच्या निषेधार्थ नवी मुंबई महानगर पालिकेसमोर आंदोलन

उरण : उरण तालुक्यातील खोपटे येथे  दि.०८ फेब्रुवारी २०२४ रोजी एन.एम.एम.टी. प्रवासी बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या भीषण अपघातात निलेश शशिकांत म्हात्रे (वय ३७ वर्षे,राहणार खोपटे) यांचा मृत्यू झाला व केशव ठाकूर (खोपटे) हे गंभीररित्या जखमी झाले.

नवी मुंबई महानगर परिवहन मंडळाने २० दिवसांच्या आत मयत व जखमी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे हमीपत्र दिले होते. मात्र आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही.

याच्या निषेधार्थ पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी नवी मुंबई महानगर पालिका सी. बी. डी. बेलापूर येथे सकाळी १०:०० वाजता शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे.

मयत कै. निलेश म्हात्रे यांच्या कुटुंबियांनी नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. कांतीलाल कडू यांनी मयत कै. निलेश म्हात्रे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

न्याय मिळण्यास विलंब होत असल्याने पनवेल संघर्ष समितीने आंदोलनाचा मार्ग निवडला आहे.


आठ महिन्यांनंतरही नुकसान भरपाई नाही; पनवेल संघर्ष समितीचे आंदोलन आठ महिन्यांनंतरही नुकसान भरपाई नाही; पनवेल संघर्ष समितीचे आंदोलन Reviewed by ANN news network on १०/१५/२०२४ ०८:००:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".