भोसरी : निवडणुकीमध्ये केंद्र व बुथ प्रमुखांची जबाबदारी महत्वपूर्ण असून बुथ यंत्रणा सक्षम असेल तरच निवडणूक जिंकणे सोपे होते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी बूथ यंत्रणेची जबाबदारी आत्मविश्वासाने पार पाडावी असे आवाहन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले.
इंद्रायणीनगर येथील पर्ल बँक्वेट हॉल येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बूथ व केंद्रप्रमुख, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांची बैठक (दि. 15) पार पडली. त्यावेळी अजित गव्हाणे बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित गव्हाणे म्हणाले, "आपली बूथ यंत्रणा सक्षम आहे. आता केंद्रप्रमुख या संरचनेप्रमाणे आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जो उमेदवार अधिकृतरित्या निवडणुकीला सामोरा जाणार आहे, त्यामागे ही यंत्रणा उभी करून भोसरी विधानसभेत आपल्याला बदल घडवायचा आहे."
त्यांनी पुढे सांगितले की महाविकास आघाडीमध्ये एकजूट असून या एकजुटीतून भोसरी विधानसभेत महाविकास आघाडीचाच आमदार होणार आहे.
भोसरी मतदारसंघातील भ्रष्टाचार, दडपशाही आणि वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांकडे लक्ष वेधत अजित गव्हाणे म्हणाले, "या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला परिवर्तन घडवायचे आहे."
Reviewed by ANN news network
on
१०/१५/२०२४ ०८:०३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: