पुणे (प्रतिनिधी): चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी पुनावळे गावाला जागतिक नकाशावर आणण्याचे आश्वासन दिले आहे. बुधवारी प्रचारादरम्यान पुनावळे गावात झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत ते बोलत होते.
कचरा डेपोच्या प्रश्नावरील १५ वर्षांच्या संघर्षाला यश मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार अश्विनी जगताप यांचे विशेष आभार मानले. या जागी आता ऑक्सिजन पार्क उभारण्यात येणार असून, त्यासाठी राज्य शासनाने निधीची तरतूदही केली आहे.
शंकर जगताप यांनी स्व. लक्ष्मणभाऊ आणि आमदार अश्विनी जगताप यांच्या कार्याचा आढावा घेत, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करण्याचे आश्वासन दिले. गावातील विविध विकास कामांचा आढावा घेत, भविष्यातील विकास योजनांचीही माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमास शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन भुजबळ, भाजप शहर उपाध्यक्ष राहुल काटे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुनावळे गावातील शेतकरी व ग्रामस्थांच्या हिताची काळजी घेत विकासाचा आलेख उंचावण्याचे आश्वासन जगताप यांनी दिले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: