शुक्रवारी पिंपरीत मुस्लिम समाजाचे मूक धरणे आंदोलन

 


पिंपरी  : मुस्लिम समाजाच्या मशिदी, दर्गे व मदरसे यांच्यावर धार्मिक भेदभावावर आधारित कारवाई करण्यात येत असल्याने, अशा प्रकारची कोणतीही कारवाई कोणत्याच धार्मिक स्थळांवर करू नये या प्रमुख मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा मुस्लिम जमातीच्या वतीने शुक्रवारी (दि.१८) दुपारी २:३० वाजता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनासमोर मूक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

या मूक धरणे आंदोलनामध्ये पन्नास हजार मुस्लिम समाज बांधव सहभागी होतील अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. आंदोलनाचे समन्वयक हाजी याकूब शेख यांनी ही माहिती दिली.

राहुल डंबाळे यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांमध्ये पिंपरी, चिंचवड तसेच शहरातील अन्य भागांमध्ये मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली धार्मिक आधारावर कारवाई सुरू आहे. शहरातील अन्य धर्मीयांची धार्मिक स्थळे तसेच व्यावसायिक तसेच अन्य अनधिकृत बांधकामे यांच्यावर कारवाई न करता, हेतूता मुस्लिम समाजावरच कारवाई करणे अन्यायकारक आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोर्चा आयोजकांची दोनदा भेट घेतली असून, त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त यांना अशा प्रकारची भेदभावपूर्वक कारवाई करू नये अशी सूचना केली आहे.

आंदोलन हे पूर्णतः मूक धरणे आंदोलन असल्यामुळे या आंदोलनात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत तसेच या ठिकाणी कोणत्याही स्वरूपात भाषणे केली जाणार नाहीत. केवळ प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये महानगरपालिका आयुक्तांना मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे.

शुक्रवारी पिंपरीत मुस्लिम समाजाचे मूक धरणे आंदोलन शुक्रवारी पिंपरीत मुस्लिम समाजाचे मूक धरणे आंदोलन Reviewed by ANN news network on १०/१५/२०२४ ०८:०४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".