पुणे: डॉ.मेहरा श्रीखंडे लिखित 'अॅन अनपॅलेटेबल ट्रूथ' या इंग्रजी पुस्तकाचे आणि 'एक न पटणारे सत्य ' या मराठी अनुवादाचे प्रकाशन दि.१३ ऑक्टोबर रोजी हॉटेल लेमन ट्री ( पुणे स्टेशन जवळ ) येथे सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थल्मोलॉजी' चे संस्थापक डॉ. श्रीकांत केळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.अरुणा केळकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.मराठी अनुवाद अशोक शिंदे यांनी केला आहे.
आपल्या जगाच्या पलीकडे काय आहे याबद्दल कुतूहल 'एक न पटणारे सत्य' पुस्तकातून पुढे येते.यूएफओ, परग्रहीय गूढ घटनांचा आणि अज्ञात क्षेत्रांचा शोध घेण्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.रॉसवेलच्या गूढ घटना ते प्राचीन इजिप्तचे रहस्य, हे पुस्तक आकर्षक कथा आणि तपशीलवार संशोधनांनी भरलेले आहे, ज्यामुळे सर्व ज्ञात गोष्टींवर प्रश्न निर्माण होतात. अनुभवी यूएफओ प्रेमी किंवा फक्त अज्ञाताबद्दल उत्सुक असणाऱ्या वाचकांचा दृष्टिकोन हे पुस्तक बदलेल. कल्पनाशक्ती प्रज्वलित करेल,असा विश्वास लेखिका डॉ.मेहरा श्रीखंडे यांना आहे.हे पुस्तक अमेझॉन किंडल वर उपलब्ध आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: