पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाच्या माध्यमातून विविध आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात येतात. यामध्ये स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुणे महानगरपालिकेच्या सर्व आरोग्य संस्थांमध्ये कायाकल्प कार्यक्रम राबविण्यात आला होता.
कायाकल्प कार्यक्रमांतर्गत, आरोग्य संस्थांमार्फत देण्यात येणाऱ्या गुणवत्तापूर्ण सेवांसोबतच रुग्णालयाची स्वच्छता, संसर्ग नियंत्रण यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर विशेष लक्ष दिले जाते. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी दरम्यान प्रत्येक आरोग्य संस्थेचे संस्थास्तरीय परीक्षण समितीद्वारे परीक्षण केले जाते. अंतिम परीक्षण पार पडल्यानंतर नागरी प्राथमिक आरोग्य संस्था आणि प्रसुतीगृहांना उत्कृष्ट कामगिरीसाठी महानगरपालिका तसेच राज्यस्तरावर बक्षिसे प्रदान केली जातात.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये पुणे महानगरपालिकेतील २५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना एकूण रुपये १५.५० लाखांचे (अक्षरी पंधरा लाख पन्नास हजार रुपये) बक्षीस मिळाले आहे. यापैकी छत्रपती शाहू महाराज नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम क्रमांकाचे बक्षीस, रुपये २ लाख (अक्षरी दोन लाख रुपये) राज्य सरकारकडून प्रदान करण्यात आले आहे. तसेच ६ प्रसूतिगृहांना रुपये ६ लाख (अक्षरी सहा लाख रुपये) बक्षीस मिळाले आहे.
या यशासाठी प्रशासक तथा आयुक्त राजेंद्र भोसले, अति. आयुक्त पृथ्वीराज बी.पी, आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे, उपआरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव, सहा. आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा नाईक, नोडल अधिकारी गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम डॉ. लता त्रिंबके, नोडल अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर चकोर यांच्या मार्गदर्शनाखाली एन.यू.एच.एम कार्यालयातील सर्व कर्मचारी तसेच संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि प्रसूतिगृहातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.
पारितोषिक पात्र आरोग्य संस्था (UPHC) व त्यांची पारितोषिक रक्कम:
| अ.क्र. | आरोग्य संस्था | पारितोषिक रक्कम |
| १ | छत्रपती शाहू महाराज दवाखाना | २,००,०००/- विजेता |
| २ | कै. दशरथ बळीराम भानगिरे दवाखाना | १,५०,०००/- द्वितीय क्रमांक |
| ३ | पुणे मनपा दवाखाना, कात्रज | १,००,०००/- तृतीय क्रमांक |
| ४ | पुणे मनपा दवाखाना, कोंढवा बु. | ५०,०००/- उत्तेजनार्थ |
| ५ | स्व. प्रेमचंद ओसवाल दवाखाना | ५०,०००/- उत्तेजनार्थ |
| ६ | कै. कलावतीबाई मावळे दवाखाना | ५०,०००/- उत्तेजनार्थ |
| ७ | कै. पृथक बराटे दवाखाना | ५०,०००/- उत्तेजनार्थ |
| ८ | कै. गेणबा तुकाराम म्हस्के दवाखाना | ५०,०००/- उत्तेजनार्थ |
| ९ | कै. विष्णू यशवंत थरकुडे दवाखाना | ५०,०००/- उत्तेजनार्थ |
| १० | कै. शिवशंकर पोटे दवाखाना | ५०,०००/- उत्तेजनार्थ |
| ११ | डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र | ५०,०००/- उत्तेजनार्थ |
| १२ | कै. रखमाबाई तुकाराम थोरवे दवाखाना | ५०,०००/- उत्तेजनार्थ |
| १३ | सिद्धार्थ दवाखाना | ५०,०००/- उत्तेजनार्थ |
| १४ | युगपुरुष राजा शिवछत्रपती दवाखाना | ५०,०००/- उत्तेजनार्थ |
| १५ | गं. भा. इंदुमती मणिलाल खन्ना दवाखाना | ५०,०००/- उत्तेजनार्थ |
| १६ | बाणेर स्मार्ट क्लिनिक | ५०,०००/- उत्तेजनार्थ |

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: