विधायक पुणेरी रंग टिपण्यासाठी 'पुणे द सिटी ' संवाद उपक्रम !

 

पुणे : पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव आणि नामांकित व्यक्तिमत्वाचे विधायक वैविध्य समोर आणण्यासाठी  'पुणे द सिटी ' हा संवाद उपक्रम सुरु करणार असल्याची माहिती उपक्रमाचे  संयोजक  आनंद केशव यांनी  पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. निवृत्त कर्नल राजीव भारवान, कुमार सुरेश,रुपम डे हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

'पुणे द सिटी' नावाच्या  पॉडकास्टमधून हा संवाद कार्यक्रम सुरू होत आहे. या पॉडकास्टचा उद्देश श्रोत्यांना विविध विषयांवरील विचारप्रवर्तक चर्चांद्वारे आणि विधायक,स्फूर्तिदायक अनुभवाद्वारे प्रेरित करणे आहे.महिन्यातून विविध क्षेत्रातील  किमान चार विधायक व्यक्तिमत्वांशी संवाद साधून त्यांची प्रेरक कथा समोर आणली जाणार आहे. या पॉडकास्टचा पहिला भाग निवृत्त कर्नल राजीव भारवान यांच्या सैन्य दल आणि सामाजिक कार्यातील योगदानाविषयी  झालेल्या  रोचक संवादाने आणि आरजे सुमित यांच्या कौशल्यपूर्ण संचालनाने सजलेला आहे. 

'समाजोपयोगी कारणांसाठी कार्यरत असलेल्या संस्थांसोबत सहयोग करून, या उपक्रमाद्वारे मदत करण्यास   'पुणे द सिटी'  कटिबद्ध आहे. विशेषतः आम्ही "द ब्लेस्ड वन" या संस्थेसोबत सहकार्य करीत आहोत, जी विशेष मुलांच्या मदतीसाठी कार्य करते. आम्ही एकत्र येऊन बदलासाठी प्रेरणा निर्माण करण्याचे आणि सर्वांसाठी समावेशकता प्रोत्साहित करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहोत',असे आनंद यांनी सांगितले. स्टुडियो हब ,रुपम डे यांचे सहकार्य या उपक्रमाला मिळाले  आहे

'पुणे द सिटी'पॉडकास्ट उदघाटन प्रसंगी  प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सल्लागार श्रीमती श्वेता शालिनी ,डी वाय पाटील विद्यापीठ, आकुर्डीचे कुलगुरू प्रोफेसर प्रभात रंजन,कर्नल राजीव भरवान आणि आरजे सुमित यांना निमंत्रित करण्यात आले आहे . हा कार्यक्रम मिलन कॉम्प्लेक्स ,खडकी येथे  ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता होत आहे. 
विधायक पुणेरी रंग टिपण्यासाठी 'पुणे द सिटी ' संवाद उपक्रम ! विधायक पुणेरी रंग टिपण्यासाठी 'पुणे द सिटी ' संवाद उपक्रम ! Reviewed by ANN news network on १०/०७/२०२४ ०३:२७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".