नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील.
महाराष्ट्रात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होईल. राज्यात ९.६३ कोटी मतदार असून त्यांच्यासाठी १ लाख १८६ मतदान केंद्रे असतील.
निवडणुकीच्या महत्त्वाच्या बाबी:
१. नवे मतदार: २०.९३ लाख
२. पुरुष मतदार: ४.९७ कोटी
३. महिला मतदार: ४.६६ कोटी
४. ८५ वर्षांवरील मतदारांना घरातून मतदानाची सुविधा
५. संपूर्ण मतदान प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार
सध्याच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपत आहे. त्यापूर्वी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर
Reviewed by ANN news network
on
१०/१५/२०२४ ०४:२१:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/१५/२०२४ ०४:२१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: