भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'अंबाभवानी' या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अथर्व चौधरी यांच्या 'ओजस,पुणे' संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला. शनिवार,दि. ५ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.नियती विसाळ(भरतनाट्यम),हृदया हरिदास(मोहिनीअट्टम)आणि मधुरा आफळे(कथक) नृत्य सादर केले. हा कार्यक्रम विनामूल्य होता. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २२५ वा कार्यक्रम होता .
नियती विसाळ यांनी भरतनाट्यम मधून ललिता त्रिपुरसुंदरी देवीची कथा सादर केली.मधुरा आफळे यांनी सुरूवातीला 'ध्रुपद ' सादर केले त्यांनंतर कथक नृत्यातून शीतलामाता देवीची कथा सादर केली.हृदया हरीदास यांनी मोहिनीअट्टम मधून भ्रामरी देवीची कथा सादर केली. यानंतर ' चंदनम् ' या नृत्य प्रस्तुतीमध्ये चंदनाचे गुणधर्म आणि उपयोग नृत्यातून सादर केले. तिघीनी मिळून देवीस्तुति सादर केली आणि रसिकांची वाहवा मिळवली.या कार्यक्रमाचे निवेदन अनघा हरकरे यांनी केले.ज्येष्ठ नृत्यगुरू मनीषा साठे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले आणि सर्व कलाकारांचे कौतुक केले.अथर्व चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले.
'अंबाभवानी' नृत्य कार्यक्रमाच्या देवीस्तुतिने भारावले रसिकजन !
Reviewed by ANN news network
on
१०/०५/२०२४ ०९:३४:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/०५/२०२४ ०९:३४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: