३५ हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि अंमलदारास रंगेहाथ पकडले!


पुणे:   वडगाव मावळ पोलीस ठाण्यातील फौजदारी गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना अ‍ॅन्टी करप्शन विभागाने सापळा रचून पकडले. सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील तुळशीदास मगर (वय ५५) आणि पोलीस अंमलदार सागर कैलास गाडेकर (वय ३४) यांना ३५ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. 

तक्रारदाराविरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील मगर यांना नेमले होते. त्यांनी आणि पोलीस अंमलदार सागर गाडेकर यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. 

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ३५ हजार रुपयांची तडजोड झाली आणि बुधवारी वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीत सापळा रचण्यात आला. आरोपींनी ३५ हजार रुपये स्वीकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

या प्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करत आहेत.


३५ हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि अंमलदारास रंगेहाथ पकडले! ३५ हजार रुपयांची लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक आणि अंमलदारास रंगेहाथ पकडले! Reviewed by ANN news network on ९/०५/२०२४ १२:२०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Advt.

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".