'गोवर्धन तूप' ऍगमार्क परवाना प्रकरणात कारवाई
नाशिक: केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या विपणन आणि निरीक्षण संचालनालयाच्या नाशिक उपकार्यालयातील एका वरिष्ठ विपणन अधिकाऱ्याला तक्रारदाराकडून एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली आहे.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकारी 'गोवर्धन तूप' या ब्रँडसाठी ऍगमार्क परवाना देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागत होते. या तक्रारीनंतर सीबीआयने त्वरीत कारवाई करत सापळा रचला आणि वरिष्ठ विपणन अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले.
सीबीआयने या अधिकाऱ्याला अटक करून नाशिकमधील विशेष न्यायालयात हजर केले, जिथे न्यायाधीशांनी त्याला ५ सप्टेंबर २०२४ पर्यंत सीबीआय पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
सीबीआयने या प्रकरणाचा तपास पुढे चालवला असून, अधिकाऱ्याच्या निवासी आणि कार्यालयीन परिसराची तपासणी करण्यात आली. यावेळी काही महत्वाच्या कागदपत्रांची जप्ती करण्यात आली असून, या कागदपत्रांमुळे अधिकाऱ्यावरच्या आरोपांची पुष्टी झाली आहे.
या प्रकरणात सीबीआयकडून पुढील तपास सुरु असून, अधिकाऱ्यांच्या इतर गुन्हेगारी कृत्यांचा शोध घेण्यासाठी पुढील पाऊले उचलली जात आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या घटना उघडकीस येत असताना, अशा कृत्यांना कठोर शिक्षा दिली जाणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: