पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना सक्तवसुली संचनालयाकडून (ईडी) मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. दि.२१ ऑगस्ट रोजी तब्बल 16 तास चौकशी केल्यानंतर ईडीनं बांदल यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
तब्बल सोळा तास झाडाझडती..
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात मोठे वलय असणाऱ्या मंगलदास बांदल यांच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर आणि पुण्यातील महमंदवाड येथील निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले होते.तब्बल सोळा तास ईडीचे पथक तपासणी करत होते. दरम्यान, यावेळी राज्य राखीव पोलिस दलातील पोलिसांचा परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बांदल यांना यापूर्वी शिवाजीराव भोसले बँकेच्या कर्जप्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणात ते जामीनावर बाहेर होते.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीचे पथक तपासासाठी दाखल..
दि.२१ ऑगस्ट रोजी या प्रकरणामध्ये बांदल यांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीचे पथक बांदल यांच्या तपासासाठी दाखल होऊन या तपासात निवासस्थानी 5 कोटी 60 लाख रूपयांची रक्कम, पाच आलिशान गाड्या आणि एक कोटी किंमतीची चार मनगटी घड्याळे आढळून आली आहेत. त्यानंतर सोळा तासांच्या चौकशीनंतर बुधवारी पहाटे ईडी अधिकाऱ्यांनी मंगलदास बांदल यांना अटक केली.
दरम्यान, मंगलदास बांदल हे पुणे जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठं नाव आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या भेटीने त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली होती..
Reviewed by ANN news network
on
८/२१/२०२४ ०१:०४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: