पुण्यात २०,२१ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन

 


पुणे: भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आणि प्रा.रमणलाल शहा ज्योतिष अॅकॅडमी आयोजित ४२ वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन दि.२०,२१ ऑगस्ट रोजी पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.उद्यान प्रसाद मंगल कार्यालय(सदाशिव पेठ) येथे हे दोन दिवसीय अधिवेशन सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत होणार असून २० संस्थांचा या अधिवेशनाच्या आयोजनात सहभाग आहे.देशभरातून नामवंत ज्योतिर्विद या अधिवेशनात सहभागी होणार आहेत.या अधिवेशनात विविध ज्योतिष विषयांवर देशभरातील तज्ज्ञांची चर्चासत्रे, प्रदर्शन, स्पर्धा ,पुस्तक प्रदर्शन आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.भालचंद्र ज्योतिर्विद्यालयचे संस्थापक चंद्रकांत शेवाळे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

वास्तुतज्ज्ञ कैलास केंजळे,नवनीत मानधनी  हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.दि.२० ऑगस्ट रोजी सकाळी ९  वाजता अधिवेशनाचे उद्घाटन डॉ.दत्तप्रसाद चव्हाण यांच्या हस्ते ,डॉ.सुनीता पागे,डॉ.त्रिशला शेठ,डॉ.नितीन गोठी यांच्या उपस्थितीत होणार आहे.याच दिवशी  डॉ.सीमा देशमुख यांच्या योगीराज वास्तू  या संस्थेस कार्यगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. 

दि.२१ ऑगस्ट अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले असून आण्णा बन्ने,प्रिया मालवणकर,डॉ.चंद्रकला जोशी,लालकिताब ज्योतिष पद्धतीचे मार्गदर्शक राजकुंवर करवाल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.सौ.शुभांगिनी पांगारकर (नाशिक) यांना ग्रहांकित जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे तर कै.शीलाताई पाचारणे स्मृती आदर्श ज्योतिष शिक्षिका पुरस्कार सौ.गौरी केंजळे यांना देण्यात येणार आहे.अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ज्योतिषविषयक पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.  

पुण्यात २०,२१ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन पुण्यात २०,२१ ऑगस्ट रोजी अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन Reviewed by ANN news network on ८/१८/२०२४ ०८:५८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".