पुण्यात कायदा, सुव्यवस्थेचे धिंडवडे! पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला


पुणे: पुणे शहरात रामटेकडी परिसरात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे.

घटनेची माहिती अशी की, रामटेकडी भागात दोन मोटारसायकल चालकांमध्ये वाद सुरू होता. हा वाद सोडविण्यासाठी वानवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गेले असता, निहाल सिंग टाक या आरोपीने त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात रत्नदीप गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, निहाल सिंग टाक आणि राहुल सिंग हे दोन्ही आरोपी पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले असून त्यांच्याकडे याआधी पिस्तूलही सापडले होते. सध्या निहाल सिंग फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

गेल्या काही वर्षांत पुणे शहरात कोयता गँगच्या कारवाया वाढल्या असून, अनेकदा त्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी वारंवार कारवाई करूनही या टोळ्यांचा पूर्णपणे बंदोबस्त होत नसल्याचे चित्र आहे.

या घटनेमुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस आता कठोर भूमिका घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पुण्यात कायदा, सुव्यवस्थेचे धिंडवडे! पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला  पुण्यात कायदा, सुव्यवस्थेचे धिंडवडे! पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला Reviewed by ANN news network on ८/२६/२०२४ १२:३२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".