पिंपरी: पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमध्ये घरफोड्या करणाऱ्या एक सराईत आरोपीला अटक केली असून, त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. या कारवाईत आरोपीकडून १२ लाख ३४ हजार ९७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद रेहान अफताब शेख (वय ४८) आहे. सध्या तो उबाळेनगर, वाघोली, पुणे येथे राहत असून, मूळचा बैंगनवाडी, गोवंडी, मुंबईचा रहिवासी आहे. त्याचे दोन साथीदार गजराज मोतीलाल वर्मा (वय अंदाजे ४०), राहणार उबाळेनगर, वाघोली, पुणे मूळगाव मध्यप्रदेश, आणि सुरू चौधरी (वय अंदाजे २५ वर्ष) यांचा शोध पोलीस घेत आहेत.
मोहम्मद रेहानच्या अटकेमुळे महाराष्ट्र आणि गुजरातमधील आठ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीने जून महिन्यात चिंचवड स्टेशन परिसरातील विकी वाईन्स या दारूच्या दुकानाची फोडफोड करून १० लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लांबवला होता.
चिंचवड स्टेशन परिसरातील गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी वल्लभनगर एसटी स्टँडसमोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली आणि केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली.
ही यशस्वी कारवाई पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक कडलग, निरीक्षक (गुन्हे) धनंजय कापरे, सुहास आव्हाड, सहायक निरीक्षक दिगंबर अतिग्रे, उपनिरीक्षक गणेश रायकर, शाकिर जिनेडी, सावर्डे आणि त्यांच्या पथकाने केली.
आरोपीच्या साथीदारांचा शोध सुरू असून, पोलीस या गुन्ह्यांच्या अधिक चौकशीसाठी प्रयत्नशील आहेत. अटक आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपासासाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Reviewed by ANN news network
on
८/१९/२०२४ ०४:१६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: